Share

कर्जमाफीच्या हिशेबात बँकांकडून गडबड; बच्चू कडूंची टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांद्वारे सुरु असलेल्या हिशेबात जाणूनबुजून गडबड केल्याची तक्रार अनेक शेतकर्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर केली आहे. आणि या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी सरकारकडे एक अहवाल सादर केला आहे. एखाद्या शेतकर्याने ५० हजार रुपये कर्ज घेतले असले तर त्यावर बँकांनी एक ते दीड लाख रुपये व्याज लावले आहे.

नियमानुसार कर्ज घेतलेल्या रकमेच्या दुप्पट लावू जाऊ शकत पण त्याहून अधिक नाही. पण काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीयकृत्त बँकांनी ३ ते ४ पत व्याज लावले असल्याचं बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. आणि त्यामुळे हा अहवाल सादर केला आहे.

याबाबत कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘खरतर जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुप्पट व्याज रक्कम वसूल करता येत नाही. म्हणजे १ लाख जर कर्ज घेतलं असलं तर २ लाखांपर्यंतच व्याजासहित आणि मुद्दल असे एकूण २ लाखांवरती त्यांना वसूल करता येणार नाही. पण बर्याच मध्यवर्ती बँकेने त्याच्या दुप्पटच्या वरती तिप्पट वसूल केलेले आहे. मी अकोल्याचा पालकमंत्री असल्यामुळे पाच – सहा दिवसांपूर्वीचं त्याची सगळी माहिती मी बँकेकडून बनवली आहे.

तसेच ‘२-३ दिवसात ती सगळी माहिती येणार आणि असं कुठ झालं आहे का ? की तिथे दुप्पट वसुली झाली असले त्याची पाहणी करणार आहे. ४४अ प्रमाण जो सरकारी अभिनियम आहे, त्यामध्ये सरळ म्हणालं आहे की, दुप्पट वसूल करू नये. आणि दुप्पट वसूल केलं असेलं तर ते तपासलं पाहिजे. आणि दुप्पट वसूली झाली असल्यास ती शेतकर्यांना परत केली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जीपंजाबराव व्याजमाफी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीयकृत्त बँक जेव्हा ३० मार्चच्या आत जर माझा शेतकरी कर्ज भरत असलं तर त्याला व्याजमाफी दिली पाहिजे. पण आमच्या राष्ट्रीयकृत्त बँक व्याज माफी न देता ते व्याजासकट ते वसूल करतात. आणि मग सरकारकडून रक्कम जर आली तर परत का देत नाही याचा काही हिशोब नाही. व्याजसहित ते वसूल करायलाच नव्हती पाहिजे पण पंजाबराव व्याजमाफी योजनेत व्याजासकट करतात. याप्रकारची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाहीय, असे कडू यावेळी बोलताना म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!