Share

‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते

Published On: 

पुणे : महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकाराच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिके मिळवलेले अनेक कलाकार ‘मुळशी पॅटर्न’ च्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, देवेंद्र सारळकर यांनी ‘नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ पटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये जुळून आला आहे. अभिनेता प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!