Share

‘जनाब राऊत, तुम्हाला काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान दिसत नसेल’

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना नेहमीच एकमेकांवर टीका-टिपण्णी करताना दिसून येतात. नुकत्याच घडलेल्या उस्मानाबादमधील एका घटनेच्या मुद्द्यावरून देखील शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, जनाब संजय राऊत,महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता. जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल.

पडळकर पुढे म्हणाले, ऐन हिंदु सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून ज़र उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते. त्यावेळेसे ऐरव्ही उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असंच दिसतंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!