सातारा – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आपलं परखड मत मांडलं आहे.मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची खंतही उदयनराजे यांनी बोलून दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती-पाती मानल्या नाहीत आणि तसे शिकविलेही नाही. त्यांनी व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. मी स्वत:ला कधी मराठा म्हणून घेत नाही. मी सर्व जाती-समाज आपलाच मानतो. पण आज या वाढत्या आरक्षणामुळे माणसे दुरावली जात आहेत.
पुढे बोलताना भोसले म्हणाले, सगळा समाज कप्प्यांमध्ये वाटला जात आहे. कधीतरी आपल्याला गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. यातच आपल्या देशाची प्रगती दडलेली आहे. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. लहानपणापासूनचे जिवाला जीव देणारे मित्र दूर झाले. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
मराठा समाजातीलही अनेकांना आधाराची गरज आहे, त्यासाठी आरक्षणाची मागणी आहे. त्याचा विचार व्हायला हवा. परंतु हा प्रश्न न सुटण्यामागे मराठा समाजातील नेते आणि संघटनांमध्ये असलेला अहंभावच कारणीभूत आहे असं ते म्हणाले.
भोसले म्हणाले, “ज्याप्रमाणे इतर जाती-जमातींसाठी प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही करा. या आरक्षणामुळे संपूर्ण देश तसंच समाज जातीजातीत वाटला जातोय. त्याचप्रमाणे समाजात कटुता निर्माण झाली असून हे फार दुर्देवी आहे.”
महत्वाच्या बातम्या
- गांधी-ठाकरेंच्या सुडबुध्दीचा पर्दाफाश न्यायालयाने केला ; आशिष शेलारांचा गंभीर दावा
- सुजय विखेंचे पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांना हे खास दिवाळी गिफ्ट!
- आरक्षणामुळे माणसं दुरावत आहेत, गुणवत्तेला प्राधान्य द्यायला पाहिजे
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेस कडून भव्य ट्रक्टर रॅली काढत निदर्शने

