Share

‘आरक्षणामुळे माणसं दुरावत आहेत, गुणवत्तेला प्राधान्य द्यायला पाहिजे’

Published On: 

सातारा – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आपलं परखड मत मांडलं आहे. मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची खंतही उदयनराजे यांनी बोलून दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती-पाती मानल्या नाहीत आणि तसे शिकविलेही नाही. त्यांनी व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. मी स्वत:ला कधी मराठा म्हणून घेत नाही. मी सर्व जाती-समाज आपलाच मानतो. पण आज या वाढत्या आरक्षणामुळे माणसे दुरावली जात आहेत.

पुढे बोलताना भोसले म्हणाले, सगळा समाज कप्प्यांमध्ये वाटला जात आहे. कधीतरी आपल्याला गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. यातच आपल्या देशाची प्रगती दडलेली आहे. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. लहानपणापासूनचे जिवाला जीव देणारे मित्र दूर झाले. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

मराठा समाजातीलही अनेकांना आधाराची गरज आहे, त्यासाठी आरक्षणाची मागणी आहे. त्याचा विचार व्हायला हवा. परंतु हा प्रश्न न सुटण्यामागे मराठा समाजातील नेते आणि संघटनांमध्ये असलेला अहंभावच कारणीभूत आहे असं ते म्हणाले.

भोसले म्हणाले, “ज्याप्रमाणे इतर जाती-जमातींसाठी प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही करा. या आरक्षणामुळे संपूर्ण देश तसंच समाज जातीजातीत वाटला जातोय. त्याचप्रमाणे समाजात कटुता निर्माण झाली असून हे फार दुर्देवी आहे.”

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!