अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिर्डीचे साई मंदिर १७ मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. असंख्य भाविक मंदिर खुले होण्याची वाट बघत आहेत. परंतु भाविकांना साईबाबांचे आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवण्यात आली आहे. भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या ऑनलाईन साई ब्लेसिंग बॉक्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार सुजय विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसेच देशातील सर्व खासदार आणि राज्यातील सर्व आमदारांना साई ब्लेसिंग बॉक्स दिपावलीच्या शुभेच्छा म्हणून पाठविले आहेत.
कोरोना महामारीमुळे शिर्डीचे साई मंदिर बंद आहे. पण या जीवघेण्या कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या संकल्पनेतून शिर्डीचे प्रसिद्ध चित्रकार हेमंत यांनी ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून घरपोच साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवली आहे. स्वत: सह मित्र, आप्तेष्ट नातेवाईक यांना देखील हे बॉक्स पाठवण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुजय विखेंनी उद्घाटनावेळी पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्यासह सर्व खासदारांना दिवाळी निमित्त ही भेट पाठवत असल्याचे सांगितले आहे.
या साई ब्लेसिंग बॉक्समध्ये साई समाधीवरील फुलांपासून बनवेलेली अगरबत्ती, झेंडू फुलांपासून बनवलेला अष्टगंध, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साई कृपा दृष्टी चित्र, साई नामस्मरण सीडी, अगरबत्ती स्टँन्ड, गाईच्या गौरीपासून बनवलेले धुप, अगरबत्ती स्टँण्ड, मेणबत्ती, दिवा अशा नऊ वस्तूंचा समावेश आहे. हा बॉक्स १५०० रुपयांना देण्यात येणार असून ज्या भाविकांसाठी तो पाठवण्यात येणार आहे त्यांच्या नावाने साई संस्थानच्या अन्नदानासाठी ५१ रुपयांची देणगी पावती सदर बॉक्समध्ये असणार आहे. तर साई ब्लेसिंग बॉक्सच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम साईबाबांना दान देण्याचा मानस असल्याचे चित्रकार हेमंत वाणी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजू शेट्टीनी भरला हुंकार ; यापुढे कृषी आंदोलनं दिल्लीत होतील
- भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या अर्णबवरील कारवाईमुळेच भाजपचे आकांडताडंव
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेस कडून भव्य ट्रक्टर रॅली काढत निदर्शने

