सातारा :देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील या विषाणूचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. मात्र या लॉकडाऊनवर अनेक मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत.
उदयनराजे यांनी आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊन शिथील करण्याबाबत चर्चा केली. तसेच सातारा जिल्ह्याकरीता टास्क फोर्स स्थापित करणे, एफसीएमआर च्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे, शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची कार्यक्षमता जास्तीत जास्त उपयोगात आणणे, कोणतेही लक्षण नसलेल्या कोविड रुग्णांना घरच्या घरी उपचार घेणे कामी प्रोत्साहित करणे,शासकीय किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडिसिन असलेल्या फिजीशियन्सची चांगल्या प्रमाणात प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे,सर्वसाधारण रुग्णालय फक्त कोविड-१९ च्या रुग्णांसाठी समर्पित करणे व अन्य रोगाचे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचारार्थ पाठविणे,डब्ल्यूयुआययडी टास्क फोर्स समितीने सुचवलेप्रमाणे रुग्णांना डिस्चार्ज देणेबाबत धोरण ठरवणे, सर्वसाधारण रुग्णालयांच्या कोविड सोडून इतर रुग्णांसाठी आर्यांग्ल हॉस्पिटलचा पर्याय निर्माण करून तो पर्याय राबविणे या व अश्या अनेक प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेऊन भोसले यांनी सखोल चर्चा केली.
‘कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नव्हे. सर्वच ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे. तसेच 10 ते 2 या वेळेत शिथीलता दिली म्हणजे या वेळेत कोरोना नसतो का?’ असा सवाल उदयनराजे यांनीउपस्थित केला.
‘शंभर वर्षातून एकदा अशा पद्धतीने कोरोनासारखी परिस्थिती उद्भवते. या परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता ही एक शिकवण आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाहीत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लवकरात लवकर यावर लस निघावी अशी ईश्वराला त्यांनी प्रार्थना केली,’ असे उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ झाला लीक
‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!
‘मदरशांसाठी कोट्यावधींचा निधी तर कोविड योध्याचे वेतन अजूनही थकलेले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

