Share

रणजी ट्रॉफी: श्रीलंका दौऱ्याआधी हनुमा विहारीची शतकी खेळी

Published On: 

मुंबई: भारतीय संघाची श्रीलंका दौर्यासाठी लवकरच घोषणा होणार आहे. याआधी सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा टेस्ट मधील विशेष खेळाडू हनुमा विहारी याने शासकीय खेळी केली आहे. चंदीगड विरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात हनुमा विहारीने १३३ चेंडूत शतक पूर्ण केले आहे.

हैद्राबादचा चंदीगड विरुद्ध सामना सुरु आहे. ज्यात पहिल्या इंनिंगमध्ये हैद्राबादने ३४७ धाव केल्या होत्या. आणि तेव्हाही हनुमाने अर्धशतक ठोकले. तर धावांचा पाठलाग करताना चंदीगडकडून मनन वोहराने शतक झळकावले होते. दुसऱ्या इंनिगमध्ये हैद्राबादने २६९ धावांवर इंनिग घोषित केली आहे.

हनुमा विहारी भारतीय संघासाठी टेस्टमध्ये मुख्य खेळाडूंपैकी एक आहे. श्रीलंका दौऱ्याआधी त्याला गवसलेला फॉर्म भारतीय संघासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म बघता विहारिला संघात वरच्या फळीवर खेळायची संधी मिळू शकते. त्याने १३ कसोटी सामने खेळले असून, ६८४ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!