Share

शिवसेना खासदार संजय जाधव म्हणाले- ‘…हे तर आमदार बाबाजानी दुर्रानींचे षडयंत्र!’

Published On: 

परभणी : शिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्यावर जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील काळे कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे. रामप्रसाद काळे यांच्याकडून खासदार जाधव यांनी काळे कुटुंबीयांची संमती न घेताच जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत काळे कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विशेष म्हणजे, या जमीन खरेदीविरोधात काळे यांच्या दोन मुलींनी आईवडील आणि खासदार जाधव यांच्या पत्नीविरुद्ध कोर्टात दाद मागितली आहे. या सर्व प्रकरणावर खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया देऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. रामप्रसाद काळे हे परभणीच्या कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत.

काळे कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, आमची ही जमीन वडिलोपार्जित आहे. परंतु वडील रामप्रसाद काळे यांच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन खासदार जाधव यांनी त्यांनी परस्पर विकत घेतली आहे. या जमीन खरेदी व्यवहारात आमची संमतीही घेण्यात आली नव्हती. याविरोधात रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमा काळे, त्यांच्या मुली सारिका आणि शीतल व त्यांची सुन वर्षा स्वप्नील काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरोप केला.

काळे कुटुंबीयांची जमीन खासदार जाधव यांनी त्यांच्या पत्नी क्रांती संजय जाधव यांच्या नावाने खरेदी केली आहे. खासदार संजय जाधव म्हणाले की, रामप्रसाद काळे यांची ही जमीन मी चेकने पेमेंट करून खरेदी केली आहे. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी माझ्याविरोधात हे षडयंत्र रचले आहे. खासदार जाधव यांच्या या जमीन खरेदीची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. आता आमदार दुर्रानी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणेही महत्त्वाचे राहील.

महत्त्वाच्या बातम्या

परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव अडचणीत, जमीन हडपल्याचा गंभीर आरोप

औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना फटकारले

राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात भाजपचे मौनव्रत

अमोल मिटकरींकडून धंनजय मुंडेंना ‘क्लीन चीट’ ?

पोलिसांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, रोहित पवारांचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!