परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. त्यामुळे खासदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने उभारलेल्या सर्व पक्षीय लढण्यास यश आले आहे. या बद्दल खासदार संजय जाधव यांचा परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक आणि खेळाडू यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने सर्व पक्षीय आंदोलन उभारण्यात आले होते. यात सुरवातीला गावोगावी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. यास जिल्ह्यातील युवक, व्यापारी, वारकरी, वकील, डॉक्टर यांच्यासह सर्व स्थरातून पाठिंबा देण्यात आला होता.
परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती. मात्र, त्याला यश आले नाही. या आंदोलनाला यश मिळाले असून आता वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

