मुंबई : मराठी चित्रपटश्रुष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कंमेंट करत असतात. नुकतचं तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोवर प्रचंड कंमेंट्स येत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत.
https://www.instagram.com/p/CPC7c6HD2Ae/?utm_source=ig_web_copy_link
प्राजक्ताने नुकतेच एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चक्रिवादळ.. दुष्काळात तेरावा महिना.. गमतीचा भाग सोडा आणि स्वत:ची व कुटूंबाची जरा जास्त काळजी घ्या..’ असे कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवरती अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडत आहे. व तिच्या या कॅप्शनची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.
https://www.instagram.com/p/CPATOwdDuvQ/?utm_source=ig_web_copy_link
प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
https://www.instagram.com/p/CPFZ9KUDEHy/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- अखेर रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत चिंता ; भारतीय संघासोबत आणखी एक यष्टीरक्षक जाणार इंग्लंडला
- राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे – प्रियांका गांधी

