Share

खा. संभाजी राजे मराठा आंदोलकांना भेटले, मुख्यमंत्र्यांची बैठक लावण्याचे दिले आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलनातील आंदोलक तरुणाला भोवळ आली. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. त्यानंतर परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आंदोलकाची मंत्रालयात एक बैठक घेतली.

त्यानंतर आज दुपारी खासदार संभाजी राजे यांनी मुंबईत आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले, ‘ गेल्या ३५ दिवसांपासून इथे आंदोलक आंदोलन करत आहेत. मात्र सरकारचे त्याच्याकडे लक्ष नाही. आंदोलकांच्या किमान मागण्या काय आहेत हे तरी सरकारने जाणून घ्यायला पाहिजे होते. आमची सरकारच्या विरोधात भूमिका नाही. पण जर सरकार वेळखाऊ पण करत असेल तर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्याचप्रमाणे, मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना हटवावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. मराठा आंदोलकांच्या नियुक्त्यांबाबत अधिकाऱ्यांच्या मनमर्जीप्रमाणे कारभार चालवू नका. आंदोलकांचे काही बरे -वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच आंदोलकांच्या शिष्टमंडळाची लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. सरकारकडून पुढे काही निर्णय होईल असं वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि आंदोलक आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.’ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली.यावेळी सरकारने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर मराठा क्रांती मोर्चा विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून आंदोलन तीव्र करतील, असा इशारा शिष्टमंडळानं सरकारला दिला. तर या प्रश्नावर कायदेशीर पद्धतीने काय करता येईल, हे पाहू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!