मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाष्य केल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड मुंबईत दाखल झाले आहेत. दुपारी साडेतीन वाजता ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले होते. परंतु या बैठकीत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी कोणतेही झालेली नाही आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चर्चा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वर्षा निवास्थानी बोलवलं आहे. संजय राठोड हे वर्षा निवास्थानात दाखल झाले आहेत. संजय राठोड यांना वर्षामध्ये दाखल होऊन सुमारे तासभर उलटून गेला आहे. तर, शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
विरोधी पक्ष भाजपने राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी कारवाई करावी असं मत व्यक्त केल्याचे देखील सूत्रांकडून मिळत आहे. दिवसभरात राजकीय घडामोडींना वेग आला असून काही वेळा पूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. या शिवाय काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील वर्षा बंगल्यामध्ये असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. यामुळे राजीनामा घेणार की संजय राठोड यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना अभय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घरबशा मुख्यमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले ; भाजप नेत्याची जहरी टीका
- इंग्लंडचे ‘अक्सर’शः लोटांगण; ११२ धावांमध्ये भारताने इंग्रजांना धाडलं माघारी
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- संजय राठोडांच्या वनविभागाचा प्रताप; शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वादग्रस्त फलक
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
