Share

खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  वंचित बहुजन आघाडीचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत जलील यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे जलील हे वंचित बहुजन आघाडीकडून विजयी झालेले एकमेव खासदार आहेत. तसेच औरंगाबाद विधानसभा मतदार संघाचे आमदारही आहेत.

आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ही नियुक्ती केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!