Share

मोठी बातमी : १ ऑगस्टपासून सुरु होऊ शकते जिम अन् सिनेमागृह

Published On: 

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर अनलॉकची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 31 जुलै रोजी अनलॉक-2 संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक-3 बाबत सरकार सध्या विचार करत आहे. याअंतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सिनेमागृह सुरू केली जाऊ शकतात. सूचना प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे, यात सिनेमागृह खुली करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. सुरुवातीला 25 टक्के जागा आणि नियमांचे काटेकोर पालन करून सिनेमा हॉल सुरू करावे, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. एवढेच नाही तर अनलॉक -3 मधील सिनेमा हॉलसोबत जिम देखील उघडण्यात येण्यावर चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने विचार केला गेला नाही.

उशिरा सुचलं शहाणपण, ‘तो’ वादग्रस्त पाठ अभ्यासक्रमातून वगळला

सिनेमा हॉल 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे बोलले जाते. सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे पालन करुन काही नियमावली यासाठी आखली जाऊ शकते. माहिती व प्रसारण मंत्रालयाने सिनेमा हॉल पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे ठेवला आहे. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी त्यांनी प्रमुख सिनेमागृहांच्या मालकांशी चर्चा केली होती. दुसरीकडे, व्यायामशाळा आणि जिम पुन्हा सुरु करण्याची मागणीही जोर धरत आहे. त्यामुळे केंद्र सरकार काही निर्बंधांसह जिम पुन्हा उघडण्यास सशर्त परवानगी देण्याच्या तयारीत आहे.

कोसळणार : राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!