पुणे : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील यदुनाथ थत्ते लिखित ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हा वादग्रस्त पाठ कमी केलेल्या अभ्यासक्रमातून पूर्णपणे वगळण्यात आला आहे. इयत्ता पहिले ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केलेल्या अभ्यासक्रमात याबाबत तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांना या वादग्रस्त पाठाचा अभ्यास करावा लागणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापन तसेच वार्षिक परीक्षेत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. त्यामुळे या पाठावर कोणतीही परीक्षा होणार नाही, बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी याबाबतची माहिती दिली.
बालभारतीचे इयत्ता 8 वीचं मराठीचं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’, या पाठात चूक असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर अनेकांनी याबाबत टीका केली होती. या टीकेनंतर यंदा आठवीच्या अभ्यासक्रमातून ते कमी करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकातील दोन ते सहा या क्रमांकाचे पाठ कमी केला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षेत या पाठातील कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. या पाठावर कोणतीही परीक्षा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत यंदाचा पाठ अभ्यासासाठी कमी केला आहे.
कोसळणार : राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज
“आठवीच्या अभ्यासक्रमातील कोणताही पाठ वगळण्यात आलेला नाही. संबंधित पाठ फक्त अभ्यासाला घेतलेला नाही. कोणत्याच पुस्तकातून काहीच वगळलेलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. स्वाध्याय किंवा प्रश्नपत्रिकेत त्याच्यावर कोणताही प्रश्न येणार नाही. मुलं यासंदर्भात स्वयंअध्ययन करू शकतात. मात्र त्यावर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही,” असे स्पष्टीकरण बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी दिले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेली आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “माझ्या देशावर माझे प्रेम आहे” या पाठात चूक झाल्याचे निदर्शनास आले होते.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करू-जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

