Share

भारताबाहेरही कृषी कायद्यांविरोधात आंदोलन

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज अकराव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. तेव्हापासून हे आंदोलन सुरुच आहे.  शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. या आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही.

त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास ‘मौन व्रत’ धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ ‘होय’ की ‘नाही’ या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला अनेक पंजाबी कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. तसेच कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.

देशाबाहेर लंडन मधील भारतीय दूतावासासमोर रविवारी निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी फलक झळकवत मोदी सरकारविरूद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे तिथे मोठ्या प्रमाणाच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. आंदोलनातील 13 आंदोलनकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!