मुंबई : कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हाच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट उभारण्याचे काम देखील झाले. या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यात आपत्ती आल्यास त्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आतापर्यंत ज्यांनी या ट्रस्टला मदत केली अशा सर्वांचे मनस्वी आभार मानतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणतीही आपत्ती ही काही काळापुरती मर्यादित असते. परंतु कोविड हा आजार पाहिला तर या आजाराचा मागील तीन महिन्यांपासून प्रादुर्भाव असून जनतेने राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमांचे नियमांचे पालन केले नाही तर फार मोठी किंमत सर्वांना मोजावी लागेल, त्यामुळे प्रत्येकाने शासनाला सहकार्य करत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले.
कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जी मदत केली गेली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो अशा भावना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. मागच्या काळात अजित दादांनी रंगभूमीला ५ कोटी रुपयांची मदत केली होती. अशीच मदत या संकटकाळातही करावी, अशी विनंतीही शरद पोंक्षे यांनी अजित पवार यांना यावेळी केली. मात्र गांधी विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावर गांधी हत्याचे समर्थन करणारा शरद पोंक्षे यांची हजेरी चर्चेचा विषय बनली आहे.
पुरोगामी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावर चक्क शरद पोंक्षेची हजेरी
दरम्यान आता शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोंक्षे यांच्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल’. अस जयंत पाटील यांनी सांगितल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे. अस देखील जयंत पाटील म्हणाले.
रामदेव बाबांच्या कोरोनावरील औषधाला मोदी सरकारचा झटका, घेतला हा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

