Share

बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावे ; तिसऱ्या लाटेची भीती

Published On: 

पुणे : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

परंतु आता राज्यावर आणि देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा त्यादृष्टीने सज्ज होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रात अद्याप अपेक्षित प्रमाणात कोरोनाचा धोका कमी झाला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आजही दररोज साडे तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

यामध्ये जिल्ह्यात बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावे व क्रियाशील रुग्ण आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी केली व नियमांचे उल्लंघन केल्यास तिस-या लाटेला लवकरच निमंत्रण देऊ, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आणि क्रियाशील रुग्ण बारामती आणि जुन्नर तालुक्यात आहेत. तर जिल्ह्यात आजही 91 गावे कोरोनाची हॉटस्पॉट गावे आहेत. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव आणि दौंड या तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बारामती तालुक्यात तब्बल 940 क्रियाशील रुग्ण असून 680 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर जुन्नर तालुक्यात 523 कोरोना बाधित रुग्ण व क्रियाशील रुग्णांची संख्या 751 च्या घरात गेली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हद्दीत सर्वाधिक ६६ क्रियाशील कोरोना रुग्ण आहेत. घोडेगावपाठोपाठ याच तालुक्यातील मंचर येथे ५७ तर, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ५४ क्रियाशील कोरोना रुग्ण असल्याचे दिसून आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!