नवी दिल्लीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती. त्यांनतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर ह्युंदाई क्रेटा ची ७ सीटर व्हेरियंट भारतात पहिल्यांदा दिसली होती.
ह्युंदाई च्या क्रेटा ची ७ सीटर व्हेरियंट ची चर्चा असुरू असतानाच आता ब्रिटिश कंपनी मॉरिस गॅराजेज भारतात पुढील वर्षी आपली जबरदस्त इलेक्ट्रिक कार MG ZS EV चे पेट्रोल वेरियंट लॉंच करणार आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटच्या या कारच्या लाँचिंगची वाहन चाहत्यांना एक वर्षापासून उत्सूकता आहे.
२०२१ मध्ये एमजी झेडएसचे पेट्रोल वेरियंट लाँच करण्यात येणार असून, या कारमध्ये व्हील साइज १७ इंचाची आहे. एमजीच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये एमजी हेक्टर प्रमाणे १.५ लीटरचे पेट्रोल इंजिन दिले असून, ते १४१ बीएचपीचे पॉवर जनरेट करते.
कारमध्ये एसयूवीचे फीचर्समध्ये अॅपल कार प्ले, अँड्रॉयड सपोर्ट सोबत १०.१ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे. ३६० डिग्री कॅमेरा आणि नेविगेशन सारखे फीचर्स दिले असून, यात मल्टी फंक्शनल स्टियरिंग, सनरूफ आणि स्मार्ट कनेक्टिविटी सारखे फीचर्स पाहायला मिळतील.
तसेच सेफ्टी फीचर्स मध्ये रियर पार्किंग सेन्सर, एअरबॅग्स, सीट बेल्ट अलर्ट, सह अनेक फीचर्स असणार आहेत. या कारमध्ये नवीन ग्रील प्रोजेक्टर, एलईडी डीआरएल हेडलँम्प, स्पोर्टी बंपर स्टायलिश फॉगलँम्प लावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा समाजाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत,त्या शंका दूर करणे आवश्यक आहे’
- सरकारकडून गाडीमध्ये फास्टॅग लावण्याची डेडलाईन वाढवण्यात येऊ शकते
- ‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
- जिओ ग्राहकांना खुशखबर ! उद्यापासून प्रत्येक नेटवर्कवर करता येणार फ्री कॉलिंग
- डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक

