Share

‘आत्तापर्यंत राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त’

Published On: 

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बुधवारी निदान झालेले १०,३०९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३३४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२५ (४२), ठाणे- २३२ (४), ठाणे मनपा-२८१ (९),नवी मुंबई मनपा-२९० (४), कल्याण डोंबिवली मनपा-३७१ (२३),उल्हासनगर मनपा-३० (७), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (१८) , मीरा भाईंदर मनपा-१२५ (४),पालघर-११२ (२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-२८३ (१९), पनवेल मनपा-१७४ (१७), नाशिक-११९(१),नाशिक मनपा-५३५ (९), मालेगाव मनपा-५१, अहमदनगर-४२४ (३), अहमदनगर मनपा-२५०, धुळे-४, धुळे मनपा-४(२), जळगाव-३२३ (३), जळगाव मनपा-१४३ (१), नंदूरबार-१० (४), पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा-१२८२ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-७१४ (१४), सोलापूर-२५३ (९), सोलापूर मनपा-३८, सातारा-१९३ (३), कोल्हापूर-२६४ (१२), कोल्हापूर मनपा-१६६, सांगली-८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-११४ (६), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१), औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१), हिंगोली-४, परभणी-१४, परभणी मनपा-३०,लातूर-१३४(१), लातूर मनपा-१८ (२), उस्मानाबाद-१४२ (३), बीड-८९ (२) , नांदेड-१२२ (३), नांदेड मनपा-१८ (२), अकोला-२८, अकोला मनपा-४, अमरावती- २२ (१), अमरावती मनपा-२७, यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७, नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५), वर्धा-१० (३), भंडारा- ५,गोंदिया-४६, चंद्रपूर-३८, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचेही कोल्हापूरकडे लक्ष; पंचगंगेची पाणीपातळी धोक्याच्या पाणीपातळीकडे

बुधवारर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

ज्यांचं सरकार आहे ते श्रेय घेणारच;संजय राऊत यांनी काढला भाजपला चिमटा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!