Share

शिवसैनिकाकडून कमी जास्त काम होऊ शकते, त्याला शिवसेनेतून काढणे योग्य नाही-आमदार दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसैनिकाकडून कमी जास्त काम होऊ शकते मात्र, त्याला शिवसेनेतून बाहेर काढणे योग्य नाही. आपली संघटना हे एक कुटुंब आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांना आपल्याला सांभाळून घ्यायचे आहे. सर्कल, गाव रचना पूर्ण करून प्रत्येकापर्यंत पोहचवा अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार आंबदास दानवे यांनी दिल्या. गंगापूर तालुक्यात ठीकठिकाणी आयोजीत शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

अनेक पक्षाच्या मोहिमा होतात मात्र, शिवसेनेची संपर्क मोहीम ही अभूतपूर्व आहे. देशात क्रमांक एक चे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. आणि एवढे मोठे नेतृत्व या शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याने याचा अभिमान प्रत्येक शिवसैनिकाने बाळगला पाहिजे. शेतकऱ्यांचे हित जोपासणे, युवकांचे कल्याण करणे, महिलांचे संरक्षण करणे हे ध्येय घेऊन प्रत्येक शिवसैनिक निस्वार्थ भावनेने काम करत असतो. त्यामुळे आम्हाला वेडे म्हटले तरी चालेल मात्र लोकविकास करणे आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय असल्याने आम्ही ध्येयवेडे शिवसैनिक आहोतच असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते ३१ जुलै दरम्यान राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात संभाजीनगर, गंगापूर तालुक्यातील सिंधी सिरजगाव (आंबेलोहळ), लासुर स्टेशन, गाजगाव, शिल्लेगाव, रांजणगाव, या गावातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!