पुणे : शहरात धनकवडी, सिंहगड रस्ता तसेच शिवाजीनगर परिसरात गेल्या 24 तासात तब्बल 100 मिमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर नगररस्ता, हडपसर परिसरातही मोठा पाऊस झाला असून या पावसामुळे शहरात जवळपास 24 ठिकाणी रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी सचल्याच्या घटना घडल्या असून अनेक रस्त्यावर पाण्याची तळी साचल्याने शहरातील वाहतुकीचा वेग सकाळ पासून मंदावलेला आहे.
शहरात जूनपासून २४ सप्टेंबरपर्यंत तब्बल ९३१.० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण सरासरीच्या ३७१ मि.मी.ने जास्त आहे. पावसाळ्यातील गेल्या १४ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. २००५ मध्ये चार महिन्यांत १९६३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याचे हे दुसरे वर्ष आहे.
परतीच्या पावसानं पश्चिम महाराष्ट्रासहीत रायगडमध्ये धुमाकूळ घातलाय. वाहतुकीचे अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने मंगळवारी रात्रीपासूनच पुन्हा हजेरी लावली.
अमळनेर तालुक्यातील सात्री या गावचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे बोरी नदीचं पाणी पात्र ओलांडून बाहेर आलं आणि गावाला पुराचा वेढा पडला. सुमारे 20 दिवसापासून गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. कोणी आजारी पडल्यास गावकरी रुग्णाला बोटीत पाण्यात टाकून त्यावर बसवून पोहत पोहत शेजारील गावी आणत आहेत.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्यात सलग दोन दिवस परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावलीय. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्याला झोडपून काढलंय. रात्री उशिरा जोरदार पाऊस पडत असल्यानं अनेक ठिकाणी नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहतायत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176769305578356738?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176768353785876480?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176768139339546624?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

