मुंबई – देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ चा प्रचार करण्यात येत आहे. मात्र असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
बनारसच्या घाटावरील प्रेतांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी प्रेते गंगा नदी टाकली या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारस मॉडेल बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली असल्याचे समजते.
बनारस मॉडेल काही नाही. ना टेस्टींग होत होती ना उपचार होत होते.औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळ्या बाजाराने विकला गेला. ‘बनारस मॉडेल’ हे ‘निदान मॉडेल’ सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा प्रचार बंद करा असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा ? – सचिन सावंत
- ‘मुख्यमंत्री साहेब…चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता’
- ‘कोकणच्या जनतेने शिवसेनेला आजवर भरभरून दिले, मात्र आज त्याच जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले’
- संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच; विश्वास पाठक यांचा गंभीर आरोप
- ‘खासगी रुग्णलयांत होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऑडीटर नेमण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलावीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

