Share

तब्बल सातवेळा खासदार असणाऱ्या मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये गूढ मृत्यू

Published On: 

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला.

डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डेलकर हे लोकसभेतील दादरा आणि नगर हवेली मतदार संघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. मोहन डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर आणि दोन मुले अभिनव व दिविता असा परिवार आहे.

मोहन डेलकर हे तब्बल सात वेळा दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

डेलकर हे मरीन ड्राईव्हवरील हॉटेल सी ग्रीनमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. डेलकर राहत असलेल्या खोलीतून पोलिसांनी गुजराती भाषेत लिहिलेली एक आत्महत्या नोटही मिळालेली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!