भंडारा : यूपीए सरकारवेळी पेट्रोलचे दर वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी टीका केली होती. आता तिच परिस्थिती आहे. देशात पेट्रोलचे भाव शंभरीवर गेले आहेत. असे असताना ते दोघेही काहीच बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या चित्रपटांचे शुटिंग राज्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.
आमचे सरकार सत्तेवर असताना पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावर तुम्ही सरकारवर टीका केली होती. आता मोदी सरकार सत्तेत आहे, पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही मोदी सरकारवर टीका करा. नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.
दरम्यान, भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच’, असं आव्हान देत महाराष्ट्रात काय मोगलाई आहे काय?’, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
गिरीश महाजन यांच्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देताना अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘भारतमातेच्या नावावर भाजप पक्ष मोठा झाला. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली आहे. गिरीज महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही,’ असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. त्यांनी भंडाऱ्यात टीव्ही ९ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना वाढतोय : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शरद पवार यांचा पाठींबा
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस…’
- केंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता
- रोहित शर्माच्या विश्वासानेच माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले केले – सूर्यकुमार यादव
- इंधनदरवाढीला विरोध करत रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस


