Share

देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत, मंदीची नकारात्मक चर्चा करून वातावरण गढूळ करू नका – भागवत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे आज विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाच्या सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. त्यानंतर स्वयंसेवकांनी पथसंचलन आणि इतर कवायतींचं प्रात्यक्षिकं दाखवली. यानंतर मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना भागवत यांनी भविष्यातील वाटचाल आणि धोरणांवर भाष्य केले. त्यांनी भाजप सरकारने अर्थव्यवस्थेची छिद्रे बुजवली आहेत. तसेच सध्या देशातील पर्यटन आणि लघुद्योगांना चालना देण्याची गरज आहे. तसेच, देशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत असंही भागवत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना अर्थव्यवस्थेविषयी नकारात्मक चर्चा करून वातावरण आणखी गढूळ होते. तसेच विकासदर शून्य टक्क्याच्या खाली गेल्यानंतर मंदी येते, आपला विकासदर अजूनही पाच टक्के देशाचा विकास होतोय, पण ठराविक काळानंतर अर्थव्यवस्थेत गतिरोधक येतात असंही भागवत म्हणाले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थिती होते. यासोबतच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर हे देखील उपस्थित राहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181430112878780416?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181422512657158144?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181417232460439552?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!