Share

सेंच्युरियनमध्ये केलेल्या विशेष कामगिरीनंतर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया; म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात (SA vs IND) भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami)  शानदार कामगिरी करताना पहिल्या डावात 5 बळी घेतले. शमीच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात एकूण 197 धावांत संपुष्टात आला आणि टीम इंडियाला मोठी आघाडी मिळाली. त्याच्या या कामगिरीनंतर मोहम्मद शमीने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

शमीने हातात चेंडू असलेला एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे आणि लिहिले की, “हा अभिमानाचा क्षण आहे, सेंच्युरियनमध्ये हे करणे विशेष आहे. प्रेम आणि समर्थनासाठी सर्वांचे आभार.”

शमीने 5 विकेट्ससह 200 कसोटी बळी पूर्ण केले. 200 कसोटी बळी घेणारा तो 5वा भारतीय ठरला आहे. सर्वात जलद 200 बळी घेणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. कपिल देव आणि जवागल श्रीनाथ त्यांच्या पुढे आहेत. पाच वेगवान गोलंदाजांमध्ये शमीशिवाय कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ आणि इशांत शर्मा यांची नावे येतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!