🕒 1 min read
नवी दिल्ली: एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सीमेवर चिनी घुसखोरी आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.
जेव्हा पाकिस्तानने पुलवामा हल्ला केला, तेव्हा मोदी म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू, मग आम्ही मारा असे सांगितले. आता चीन डोकलाम, डेपसांगमध्ये बसला आहे आणि भारताचे पंतप्रधान काहीच करत नाहीत. भारतीय सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंग सरकार पाकिस्तानला बिर्याणी खायला घालत आहे, असे तुम्ही म्हटले होते ना? नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान पंतप्रधान सर्व गोष्टींबद्दल बोलतात, परंतु ते दोन गोष्टींबाबत कधीच बोलत नाही. पहिलं म्हणजे इंधनाच्या दराने गाठलेली शंभरी आणि दुसरं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी आक्रमकतेमुळे निर्माण झालेला धोका याबाबत मोदी बोलत नाहीत. असे म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- ईद-ए-मिलादनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
- ‘पंतप्रधान ‘या’ दोन गोष्टींबद्दल कधीच बोलत नाहीत’,असदुद्दीन ओवेसींचा मोदींना टोला
- ‘अजून कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही’: भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
