🕒 1 min read
मुंबई : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने (मुजाफीर) गोड भात तयार करून वाटप केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ईद-ए-मिलादनिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
‘ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरून स्नेह वृद्धिंगत करूया, तसेच उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करून आरोग्याचीही काळजी घेऊया. अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या.’
ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरून स्नेह वृद्धिंगत करूया, तसेच उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करून आरोग्याचीही काळजी घेऊया.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 19, 2021
इस्लाम धर्मात ईद-ए-मिलाद उन-नबी हा विशेष सण मानला जातो. हा दिवस इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. याच दिवशी मोहम्मद पैगंबर यांचे निधनही झाले होते. अरबी भाषेत मौलिद शब्दाचा अर्थ जन्माशी निगडित आहे. मौलिद उन नबीचा अर्थ हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस असा होतो. या वर्षी मिलाद उन्नबी किंवा ईद-ए-मिलाद या वर्षी १९ ऑक्टोबर म्हणजे आज साजरा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
