मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली असून देशात दररोज रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा देखील कार्यक्रम सुरु आहे. मात्र सध्या देशभरात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासू लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. ‘आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपद्धत योग्य नाही,’ अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
‘निवडणुकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली’ असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. ‘आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा,’ अशी सूचनाही नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘डाल मे जरुर कुछ काला है!’ डेव्हिड वार्नरच्या वादात डेल स्टेनची उडी
- भाजपचा पराभव दिसणाऱ्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे
- मोठी बातमी : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, आज होणारा कोलकाता विरुद्ध बँगलोर सामना रद्ध
- मराठवाडयात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारण्याची आपची मागणी
- मोठी बातमी! आज होणारा आरसीबी विरुद्ध केकेआर संघाचा सामना पुढे ढकलला


