मुंबई : मोदी आहेत नंबर वन त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण! अशा खास आपल्या काव्यमय शैलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘तिसरी आघाडी बनली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए ला काही फरक पडणार नाही.
तिसरी आघाडी सारख्या आणखी कितीही आघाड्या बनल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला काही फरक पडणार नाही’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. ‘माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी तयार होत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राबाहेर फारसा प्रभाव नाही.
राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी निर्माण झाली तर त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही. त्यामुळे तिसरी आघाडी ही एनडीए चे नाही तर काँग्रेसचेच नुकसान करील.’ असा दावा ना रामदास आठवले यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
- दरेकर, महाजन आणि लाड यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली अन् नार्वेकर म्हणाले, यांच्या हाती शिवबंधन बांधा !
- पुण्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ, तर मृतांच्या संख्येत घट !
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- ‘तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता?, जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे दुर्दैवी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

