पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत किंचित वाढ होत असल्याचं दिसून येत होतं. तर, काल (दि. २१ जून) रोजी पुण्यात दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. पुणे शहरात १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
मात्र आज (दि. २२ जून) रोजी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर, कोरोनामुळे मृत पावलेल्या संख्येत घट झाली आहे. आज नव्याने २२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७६ हजार २१० इतकी झाली आहे. यासोबतच, शहरातील ३३१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६५ हजार ३१४ झाली आहे.
दिवसभरात नवे २२० कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने २२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७६ हजार २१० इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 22, 2021
ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ हजार ३५४ इतकी असून ३४२ रुग्ण गंभीर तर ४८२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ५४२ इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीचा ‘हा’ निर्णय म्हणजे पूर्ण मराठा समाजाची मुस्कटदाबी करणारा – विनायक मेटे
- दरेकर, महाजन आणि लाड यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली अन् नार्वेकर म्हणाले, यांच्या हाती शिवबंधन बांधा !
- ‘गंगेतून उत्तर प्रदेशातील मृतदेह पश्चिम बंगालमध्ये ; धोका वाढला’
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- ‘तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता?, जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे दुर्दैवी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

