Share

मोदी सरकारने युवकांचा अपेक्षाभंग केला; युवक काँग्रेसचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून देशात बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे. दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भाजप सरकारने युवकांचा अपेक्षाभंग केला आहे. लॉकडाऊन नंतर बेरोजगारी वाढली असून त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. तरुणांना लवकरात लवकर नोकर्‍या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीने, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन देत केंद्र सरकारकडे रोजगाराची मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जीएसटी, नोटबंदी या आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना संकट काळात देशात लॉकडाऊन झाले त्यामुळे साधारण १५ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. सहा वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने तरुणांचा मोठा भ्रमनिरास केला आहे.

देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून तरुणांना रोजगार देण्यासाठी केंद्र शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सोमेश्‍वर दिवटे, सचिन खेमनर, रमेश गफले, तान्हाजी शिरतार, भागवत कानवडे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

आता शिवसेनेची पडझड…काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा घणाघात

पोलीस भरतीमध्ये जास्तीत-जास्त पदे भरा- निलेश लंके

कंगणाचं कार्यालय कशासाठी पाडलं? हा सूड नाही तर काय आहे?

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!