Share

वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारकडून नवी योजनेची घोषणा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा केली. वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा केला जात आहे.

जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांनी सदैव अटल स्मतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे. आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘ “एकीकडे जल जीवन मिशन प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहचवणार आहे. त्याचप्रमाणे अटल भूजल योजना असेल. ज्या क्षेत्रामध्ये भूजल स्तर खुप खालावलेली आहे, त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करेल”.

या योजना सुरूवातीला देशातील महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर या सात राज्यात राबवण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या काळात सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.

विज्ञान भवनात हा कार्यकम आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रमात जल शक्ती मिशन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी मनोगत देखील व्यक्त केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!