Share

मोदी गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागतात, इतर राज्यांची अवहेलना का? – चव्हाण

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले. गुजरातमध्ये वादळामुळे १६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत.

दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.

यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँगेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात मोठं नुकसान केलं आहे. या वादळाचा फटका 5 राज्यांना बसला आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी केवळ गुजरात दौराच केला, तसेच मदतही केवळ गुजरातसाठीच जाहीर केली. केवळ गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे ते का वागतात, असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे. तसेच, वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यातील जनतेची अवहेलना का, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!