औरंगाबाद : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत गावखेड्यातील, दुर्गम व आदिवासी भागात असणार्या आरोग्य सुविधेत भर घालून मोबाइल मेडिकल व्हॅन ही आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यदूत म्हणून सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणारी ठरेल, असे मत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मेडिकल मोबाइल व्हॅनचे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.
मोबाइल व्हॅनमधील सेवासुविधांविषयी डॉ. निरवे यांनी माहिती दिली. यामध्ये गर्भवती महिला व नवजात बालकांच्या आरोग्याविषयीच्या सुविधांबरोबरच सामान्य बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असलेले उपचार व औषधसेवा आहेत. यात विविध आरोग्य तपासण्या करण्याची सोय उपलब्ध असल्याने ग्रामीण भागामध्ये आजारी रुग्णांना या व्हॅनमध्येच रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, फुफ्फुसाचे आजार, मुत्रविकार, एचआयव्ही व रक्ताविषयीच्या तपासण्या याठिकाणी उपलब्ध होणार असुन, ग्रामीण भागातील नागरिकांना दारात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये मेडिकल मोबाइल व्हॅन उपयुक्त ठरेल असे सीईओ डॉ. गोंदावले यांनी सांगितले.
ही व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी क्षेत्रात आरोग्यसेवा देणार आहे. याप्रसंगी प्रयोग शाळा तंत्रज्ञ विजय सानप, औषध निर्माता जयश्री भोजने, परिचारिका शिल्पा त्रिभवून वैद्यकीय निरीक्षक नाना साबळे यांच्यासह चालक मनोज शेळके उपस्थित होते. एका दिवसात किमान नव्वद व्यक्तींची तपासणी आणि उपचार करण्याची क्षमता या मोबाईल व्हॅनसह वैद्यकीय पथकाची असेल. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका, दोन वाहन चालक आणि निरीक्षक यांच्या माध्यमातून ही मोबाईल मेडिकल व्हॅन जिल्ह्यातील गरजू, गरिब आणि दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करुन देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या ‘या’ जेष्ठ नेत्यावर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी
- परभणीत पोलिसांची शेतकऱ्याला मारहाण, व्हिडिओ पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त
- शासकीय कर्करोग रुग्णालयास विलासराव देशमुख यांचे नाव द्या, औरंगाबाद काँग्रेसची मागणी!
- मेणबत्ती दोन्ही बाजूंनी पेटवण्याचा आ. संजय शिंदे यांचा हा प्रयत्न झाकुन राहीला नाही : नारायण पाटील
- ‘मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारला बहुजन समाज वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
