Share

साताऱ्यात मनसेचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपविरोधात प्रचार करा असा खुला आदेश दिल्यानंतर आता मनसे आणि राष्ट्रवादीतील जवळीकता आणखी वाढू लागली आहे. याची झलक आज महाराष्ट्रात चिंचवड आणि सातारा दोन ठिकाणी पहायला मिळाली.

सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला असल्याचे साताऱ्याचे खासदार उदयन राजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा पाठींबा जाहीर करतेवेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर दुसऱ्या बाजूला मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे बहुचर्चित उमेदवार पार्थ पवार यांचा मनसेच्या चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे सत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिंपरी चिंचवड शहराअध्यक्ष हेमंत डांगे यांच्या निवासस्थानी मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावेळी चिंचवड विभाग अध्यक्ष महेश येवले,अक्षय नाळे,रुपेश पाटस्कर आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!