Share

राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांना ‘या’ दिल्या आहेत सूचना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपला १४ व वर्धापन दिन साजरा केला. याप्रसंगी राज ठाकरे यांनी ‘मनसे’च्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. यानिमित्ताने राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेत्यांकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे नगरविकास व पर्यटन खातं आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे सुपूत्र व आताच सक्रिय राजकाणात दाखल झालेले मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘ शॅडो कॅबिनेटच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन असंही त्यांनी सांगितलं. सरकारवर वचक ठेवण्यासाठी आणि विधायक काम करण्यासाठी हे मंत्रिमंडळ आहे.

शॅडो मंत्र्यांनी ब्लॅकमेलिंग करु नये, तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.कुणीही आपली स्वतःची व्हिजिटिंग कार्ड छापू नयेत.आपल्या दिलेल्या खात्याचा तसेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर होणाऱ्या निर्णयांचा सखोल अभ्यास करावा.कुणीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यावर भूमिका मांडू नये.आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करु नये.

मनसे शॅडो कॅबिनेटची संपूर्ण यादी : वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई, जलसंपदा अनिल शिदोरे, गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन बाळा नांदगावकर, महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर, सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता, शालेय उच्च शिक्षण – अभिजित पानसे, नगर विकास आणि पर्यटन – संदिप देशपांडे , अमित ठाकरे, कामगार – राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे, वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन – अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी.

ग्रामविकास – अमित ठाकरे, उर्जा – शिरीष सावंत , सागर देवऱह, सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर, रोजगार हमी आमि फलोत्पादन – बाळा शेडगे, सार्वजनिक उपक्रम – संजय शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम – योगेश परुळेकर, सामाजिक न्याय – गजानन काळे, महिला बालविकास – शालिनी ठाकरे , सुनीता चुरी, अन्न नागरी पुरवठा – राजा चौघुले, उत्पादन – वसंत फडके, आदिवासी विकास – आनंद एंबडवार, पर्यावरण – रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील, पाणी पुरवठा – अरविंद गावडे, केतन जोशी – सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!