लातूर : मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे जिल्ह्यातील दुष्काळी गावांना पाण्याचे टँकर घेवून भेट देण्याची मोहीम हाती घेतली आहे.मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाभरातील दुष्काळी गावांतील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईची समस्या भीषण बनली आहे.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून दुष्काळाच्या प्रश्नावरुन राजकारण केले जात आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.भिकाणे यांनी आपल्या विरोधीपक्षांच्या सहका-यांना दुष्काळाच्या प्रश्नावरुन केले जाणारे राजकारण थांबविण्याचे आवाहन केले आहे.पाणी टंचाईसारख्या संवेदनशील समस्येवर केवळ कोरडे आरोप न करता दुष्काळातील जनतेची तहान भागविण्यासाठी प्रत्यक्ष मदतीच्या रुपाने पुढे या असे म्हंटले आहे.डाँ.भिकाणे हे केवळ आवाहन करुन थांबले नाहीत तर नको दुष्काळावर राजकारण,चला देवू मदतीचा हात!,अशी भावनिक साद घालत ते दुष्काळी गावांना भेटी देण्याची मोहीम घेतली आहे.
या मोहीमेत ते दुष्काळी गावांना ते आपल्यासोबत टँकर घेवून जात असून या टँकरचे पाणी मनसे कार्यकर्ते गावातील लोकांना मोफत वाटप करताना दिसत आहेत.हलगरा(ता.निलंगा),अहमदपूर,मर शिवणी(ता.अहमदपूर) आदी गावांना या मोहीमेत पाणी वाटप करण्यात आले आहे.पावसाळ्यापर्यंत आपली ही मोहीम चालू राहणार असल्याचे डाँ.नरसिंह भिकाणे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

