Share

पार्किंग माफिया फक्त मॉल मल्टिप्लेक्स मध्येच आहेत का? हॉस्पिटल,कॉलेजचं काय? मनसेचा सवाल

Published On: 

पुणे : काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने निर्णय घेत मॉल व मल्टिप्लेक्समधील पार्किंग मोफतच असावे या बाबतच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. आता याच मुद्द्यावरून मनसेने एक पाऊल पुढे टाकत पार्किंग माफिया फक्त मॉल मल्टिप्लेक्स मध्येच आहेत का..? हॉस्पिटल,कॉलेजचं काय..? असा सवाल उपस्थित करत हॉस्पिटल,कॉलेजमधील पार्किंग मोफत करण्याची मागणी एका पत्रकातून केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे मनसेने या पत्रकात ?

“पार्किंग माफिया फक्त मॉल मल्टिप्लेक्स मध्येच आहेत का..? हॉस्पिटल,कॉलेजचं काय..?

महोदय,

काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने निर्णय घेत मॉल व मल्टिप्लेक्समधील पार्किंग मोफतच असावे या बाबतच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला पालिका प्रशासनाने आणि सत्ताधारी मंडळींनी निर्णय तर घेतला म्हणून या बद्दल त्यांचं अभिनंदन करावं का…? कारण हा निर्णय त्यांनी नक्की कोणासाठी घेतला हा प्रश्न आहेच. वरील दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सातत्याने जाणारा वर्ग हा उच्चभ्रू नागरिकांचा त्यातच आय टी सारख्या सेक्टरमधून निर्माण झालेल्या नवं श्रीमंतीचा आहे.

मग त्याच वेळी शहरातील हॉस्पिटलमधील पार्किंगच्या नावाखाली अशीच लूट होत आहे.हे सातत्याने सांगून देखील कळत नाही का..? ही लूट सर्व हॉस्पिटलमधून होत आहे. अगदी ससूनमध्ये सुद्धा पार्किंग शुल्क आकारले जाते. परंतु समाजाच्या व्हाईट कॉलर वर्गाला खुश केले की, सर्व प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमातून पाठ थोपटून घेता येते आणि विकासाचा आणि जनाभिमुख निर्णय घेतल्याचा आव आणून दबावगट निर्माण करता येतो हे उमगलेल्या भाजपसारख्या पक्षाला सर्व सामान्य जनतेला खऱ्या अर्थाने लुबाडण्यात येणाऱ्या ठिकाणाची माहिती नसते . कारण तिथे हितसंबंध आडवे येतात. आणि वरील ठिकाणी निर्णय घेतले की हितसंबंध जपले जातात. असे असल्याने ऐका ठराविक वर्गाला खूश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयात खऱ्या अर्थाने जनतेला सहभागी करायचे असेल तर हॉस्पिटल व महाविद्यालयातील पार्किंग माफिया हटवण्याची धमक दाखवावी त्याचप्रमाणे शहरातील सर्वच वाहनतळ मोफत करण्यासाठी काय करता येईल याच्या संदर्भातील धोरण ठरवण्यासाठी निदान प्राथमिक विचार तरी करावा.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!