Share

राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध; ‘आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान ‘राजगृह’वर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या तोडफोड प्रकरणी मनसेने देखील या भ्याड कृत्याचा निषेध केला आहे. मनसेने ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे.

मनसेने ट्विट करत म्हटले की, हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला, हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला आहे. त्यामुळे ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं, असं मनसेनं सांगितले आहे.

दरम्यान, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

दुसरीकडे याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी करवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती संयुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

इसको बेचो उसको बेचो, कुछ ना बचे तो छप्पन इंच का सीना बेचो – कन्हैया कुमार

राजगृह तोडफोड प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करा देवेंद्र फडणवीसांची मागणी

राजगृह तोडफोड प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा – रामदास आठवले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!