🕒 1 min read
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी अशी मागणी केली आहे .याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.
राजगृह हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते.त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार घडला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.
पवारांना ‘मातोश्री’वर वारंवार भेटीसाठी बोलाविणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर शेलारांनी साधला निशाणा
राजीव गांधी फाउंडेशनच्या चौकशीचे आदेश; थोरातांनी केला केंद्र सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप
‘अन्य राज्यात 17 हजार किमीचे रस्ते मंजूर, महाराष्ट्राचे अजून प्रस्तावच नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
