Share

पुणे :रस्त्यावर स्टेज टाकून, साउंड लावून मुली नाचवणाऱ्या मोबाईल कंपन्यांना मनसेचा दणका

Published On: 

पुणे : जंगली महाराज रस्ता हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याचे रस्ते, पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पदपथ मोठमोठाले करून रस्ता अतिशय अरुंद करण्यात आला आहे. परंतु ह्या पदपथाचा व पार्किंग खरच सामान्य नागरिकांना उपयोग होत असेल का ?? तर नाही. काही मोबाईल कंपन्या ह्या आपल्या मोबाईल व कंपनीची मोफत जाहिरात करण्या करिता दर शनिवार, रविवारी या पदपथावर दिवसभर अनधिकृत स्टेज/ मांडव उभारून स्टेज शो, पथनाट्य, गेम शो घेतात व मुलीही नाचवल्या जातात.

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठमोठ्या स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभ्या करून मोठ्या आवाजात लावल्या जातात. ऐन सणासुदीच्या काळात तर काय बोलायलाच नको या ठिकाणी मोठमोठ्या प्रखर प्रकाशाच्या लाइटिंग करून मंडप पूर्ण रस्त्यावरच लावले जातात. व दिवसभर गाणी सुरु असतात. गणपती, नवरात्र, दहीहंडी, माणसाच्या आयुष्यात एकदाच येणारा लग्न सोहळ्यात व इतर उत्सवाच्या वेळेस साउंडवर, स्टेज, मंडपावर, शासन व पोलीस लगेच कारवाई करतात मग हे राजरोस पणे चाललंय यावर का कारवाई होत नाही????
या सर्व बाबतीत मनपाच्या संबंधित अतिक्रमण अधिकाऱ्यांना व पोलीस स्टेशनला कळवून सुद्धा या प्रकरणात सुधारणा होत नसल्याने अखेर मनसेने आपल्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करून या मोबाईल कंपन्यांना आज धडा शिकवला.

मनसेने या प्रकरणी ३१ ऑगस्ट २०१५ व २१/४/२०१८ रोजी महापालिका आयुक्त, पालकमंत्री, पोलीस आयुक्त, शिवाजीनगर पोलीस ठाणे, व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते तरीही संबंधित व्यावसायिक, कंपन्यांवर कारवाई झाली नाही म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजीनगर विभागाच्या वतीने ह्या मोबाईल कंपन्यांवर खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष सुहास निम्हण म्हणाले यापुढे पुन्हा जर आम्हाला पादचारी मार्गावर साउंड, स्टेज, व मुली नाचताना दिसल्यास कोणाकडेही तक्रार करणार नाही तर मनसे स्टाईल खळ्ळखट्याक आंदोलन केले जाईल ह्या आंदोलनात जर कोणाचे काही नुकसान झाल्यास सर्वस्वी मोबाईल कंपन्या व प्रशासन जबाबदार असतील.याची नोंद घ्यावी…
यावेळी मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष सुहास निम्हण, विनायक कोतकर, शंकर पवार, सतीश पाटोळे, उदय गडकरी, गोकुळ अडागळे, मुकेश खांडरे, योगेश शिंदे, नचिकेत टिकम, निखिल बाराते, प्रशांत नलावडे, दिनेश आमले, यश पढेर तसेच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!