NCP । मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या थिंक टँक नीती आयोगाच्या 7 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केले. या बैठकीत केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. ही बैठक सकाळपासून सायंकाळपर्यंत चालली. दरम्यान मिटिंगमधील फोटो व्हायरल झाले असून यामध्ये एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या ग्रुप फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे राहिले आहे. त्यावरुन महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून अमोल मिटकरी यांनी औरंगजेबाच्या आग्रा येथील दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन दिली आहे. “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
"दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले.@mieknathshinde pic.twitter.com/xRRArrRgQd
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 7, 2022
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निती आयोगाच्या बैठकीतील एकनाथ शिंदे यांच्या स्थानावरून टीकास्त्र सोडलं आहे. ‘औरंगजेबासमोर छत्रपती शिवरायांना दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे, हे पाहायला मिळत आहे,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे राज्यातील विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला डिवचायला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil । मागच्या रांगेत उभं केल्यावर शिवरायांनी दरबार सोडला, पण आता परिस्थिती बदललीय – जयंत पाटील
- Pune । पुण्यात युक्रांदतर्फे संविधान आणि धर्मस्वातंत्र्य या विषयावरील अभ्यासवर्गाचे आयोजन
- Shiv Sena । धर्म ही अफूची गोळी, रोज थोडी मात्रा दिली जात असल्यानं बहुसंख्य जनता गुंगीत : शिवसेना
- Shivsena : “ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, इतर पक्षांचं काय?”, शिवसेनेचा राष्ट्रवादीसह मित्र पक्षांना सवाल
- Sanjay Raut । तुरुंगात असताना लेख लिहिणे बेकायदेशीर; ईडीचे अधिकारी संजय राऊतांची चौकशी करणार!


