मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येतं आहेत. राज्यात सध्या निवडणूकांचं वारंही घुमू लागलं आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांची त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नितेश राणे ?
विनायक राऊत यांनाही 12 खासदारांसोबत शिंदे गटात यायचं होतं, परंतू त्यांना भाजपा नेतृत्वाने नाकरलं असेल,असं म्हणत नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर हल्ला केला आहे. नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
विनायक राऊतांची कुंडली बाहेर येईल –
एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 12 खासदारांसोबत विनायक राऊतांनाही यायचं होतं. हे एका पायावर तयार होते. कुठं किती बैठका झाल्या, त्यासाठी कसे प्रयत्न करत झाले याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. जेव्हा ही माहिती देईल तेव्हा विनायक राऊतांची कुंडली बाहेर येईल, असं राणेंनी म्हटलं आहे.
खासदारकीची चिंता करावी –
तसेच, विनायक राऊत आता फक्त 12-13 महिन्यांचे खासदार आहेत. ते जास्त काळ खासदार राहणार नाहीत. त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या बाताही मारू नये. मुळात ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांनी आपली खासदारकी वाचते की नाही याची चिंता करावी, मग आमची काळजी करावी.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane । किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
- Best Range Electric Cars | भारतात जबरदस्त रेंजसह ५ इलेक्ट्रिक कार उपलब्ध, जाणून घ्या!
- Narayan Rane । उद्धव ठाकरे लबाड लांडगे भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा टोला
- Health Tips | रात्री गरम दूध पिणे आहे औषधासारखे, जाणून घ्या फायदे
- Narayan Rane । नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंची औकात काढली


