Share

राजसाहेब बरोबर बोलले होते, अभिजित हे तुला फसवणार – मनसे 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनलेला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ सिनेमावरून आता नवीन नाट्य निर्माण झाले आहे. या चित्रपटाचा प्रीमियर काल मुंबईत पार पडला मात्र यावेळी दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. यावर बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना समर्थन देत ट्वीट केले आहे. यामध्ये  राज ठाकरेंच्या एका विधानाची आठवण करुन देत जाधव यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.

आज परत तेच झालं..शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला, पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्यासाठी… राज साहेब बरोबर बोले होते अभिजित हे तुला फसवणार.. असे ट्वीट मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.

नेमकं काय घडलं ‘ठाकरे’ च्या स्क्रीनिंगमध्ये

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये मानपानाचे नाट्यरंगले. स्क्रीनिंगवेळी सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे नाराज झाले, त्यामुळे ते स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले. मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं होत. पण ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये मानपानाचे नाट्य चांगले रंगलेले पाहायला मिळाले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही.

पानसेंचे समर्थन करत मनसेचा शिवसेनेवर निशाना

सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!