टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी शासनाने मुंबईतील हॉटेल्स, खानावळ, पोळी-भाजी केंद्र सुरु करावीत जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तर महसुलात वाढ करण्यासाठी वाईन्स शॉपीदेखील खुल्या कराव्यात, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित केली आहे. तर राज्य सरकारला पत्र देखील लिहिलं आहे.
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही ट्वीटरवरून राज ठाकरे यांची भूमिका समजावून सांगितली आहे. तसेच राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यातील वाईन शॉप, तसेच किराणा दुकानं , छोटी उपहार गृह , खानावळी , दुध केंद्र खुली करावी असं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर –
नमस्कार, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज साहेब ठाकरेंनी काल पत्र लिहलं आहे. त्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहलंय कि राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि ही आर्थिक परिस्थिती जर खरंच सुधारायची असेल तर राज्यात जे वाईन शॉप आहेत ते ताबडतोब चालू करणं गरजेचं आहे.
कारण राज्यातील वाईन शॉपचा दिवसाचा शासकीय महसूल हा ४१.५० कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी आहे. आणि हा महसूल जर राज्याच्या तिजोरीत आला तर राज्याला मदत मिळेल. याचं कारण असं कि आज आपण म्हणतो याचा विमा उतरवा त्याचा विमा उतरवा , शिवाय पोलिसांना आणि सरकारी कर्मचार्यांना पगार द्यायला तिजोरीत पैसे नसतील तर कसं चालेल?
आणि त्यामुळे हे वाईन शॉप सुरु होणं गरजेचं आहे. हे दारू पिणाऱ्यांसाठी नाही तर राज्याला महसूल मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळाला तरच ते भविष्यात व्यवस्थित चालू शकेल. शिवाय राज्यात छोटी उपहार गृह आहेत, खानावळी आहेत , पोळी भाजी केंद्र आहेत , भाजीपाला केंद्र , रेस्टोरंट , दुध केंद्र , किराणा मालाची दुकानं आहेत ही सुद्धा सुरु व्हावीत.
यामुळे त्यांच्या व्यावसायिकांच तर भलं होईलच परंतु कामगारांनाही रोजगार मिळेल. त्यात सोशल डीस्टन्सिंग राखूनच ते करावं आणि सरकारने आवश्यक ती काळजी घ्यावी. परंतु वाईन शॉप आणि इतर गोष्टी लवकरात लवकर चालू करून महसुलात राज्य सरकारने वाढ करून घ्यावी.
हे केवळ महाराष्ट्र राज्यच नाही देशातील इतर राज्यांनीही अश्याप्रकारचा निर्णय घेतला तर त्यांच्या तिजोरीत महसुलाची भर पडेल आणि राज्य चालवायला सोपं जाईल अशी राज्यसरकारला आम्ही पक्षाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद , जय हिंद – जय महाराष्ट्र.
मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती,@mnsadhikrut ,@CMOMaharashtra pic.twitter.com/54snVHoFrU
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 24, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

