Share

मनसे नेते अविनाश जाधव यांना आज देखील जामीन नाहीच!

Published On: 

ठाणे: सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत तडीपारीची नोटीस देत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची आज कोर्टात सुनावणी होती. तर, आज जामीन मिळणे अपेक्षित असताना, कोर्टात पोलिसांनी रिपोर्टच सादर न केल्याने सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.

अविनाश जाधव यांना ३ ऑगस्ट रोजी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी, जामीनासाठी मनसेतर्फे प्रयत्न केला गेला असता, तडीपारीची नोटीस असल्याने या प्रकरणी सत्र न्यायालयात पुढील सुनावणीची तारीख न्यायालायतर्फे देण्यात आली होती व कोर्टाने तोपर्यंत जामीन देखील नाकारला होता. यानंतर आज, सत्र न्यायालयात युक्तिवाद होणे अपेक्षित होता, मात्र तो आज न होता उद्यावर ढकलण्यात आल्याने, आज देखील अविनाश जाधव यांना जामीन मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नगरकरांना मोठा दिलासा, जिल्ह्यातील विद्युत विकास कामांना मिळणार गती

दरम्यान, कापूरबावडी पोलिसांतर्फे आज  कोर्टात अहवाल सादर न करण्यात आल्याने, पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने सुनावणी उद्यावर ढकलली आहे. तर, अहवाल सादर न करता आल्याच्या कारणावर मनसेच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजत आहे. अतिवृष्टी असल्यामुळे पोलिसांना रिपोर्ट सादर न करता आल्याचे कारण आता समोर येत आहे.

राम मंदिर भूमिपूजनाबाबत पाकिस्तानी क्रिकेटपटूचे ट्वीट सोशल मिडीयावर व्हायरल

वकिलांनी नाराजी व्यक्त करताना, ‘ उद्या नक्कीच जामीन मिळेल याची खात्री आहे, मात्र कापूरबावडी पोलिसांनी दिलेले पावसाचे कारण हे पटत नसून अतिवृष्टी असताना इतर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट सादर केले जात आहेत,’ असे सांगितले.  दरम्यान, याप्रकरणी आता मनसेचे नेते आक्रमक होताना दिसत असून खोटे आरोप टाकण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुढबुद्धीचे राजकारण असल्याचे आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देसाई यांनी सांगितले होते.  मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिवसेनेवर केला आहे. मनसेकडून सरकारला याप्रकरणी ‘करारा जवाब मिलेगा’ मिलेगा असं सांगण्यात आलं आहे.

कोरोनाची लस आल्यावर आपली आर्थिक स्थिती बदलू शकते – शक्तिकांत दास

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!