Share

कोरोनाची लस आल्यावर आपली आर्थिक स्थिती बदलू शकते – शक्तिकांत दास

Published On: 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आज पार पडली. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिव्हर्स रेपो आणि रेपो दर जैसे थे असल्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही किंवा रिव्हर्स रेपो दरातही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्के कायम ठेवण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

कोरोना लॉकडाऊन काळात कर्जासाठी दिलेला ईएमआय दिलासा सुरू ठेवण्याबाबत किंवा त्यावर अन्य काही दिलासा देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र आजच्या बैठकीत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे EMI दिलासा मिळण्याचा कालावधी 31 ऑगस्टला संपणार आहे. बँकांनीही या मुदतवाढीचा गैरफायदा घेण्याची शक्यता वर्तविली होती. यामुळे अद्याप यावर निर्णय घेतला नसल्याचे समजते.

रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाबद्दल माहिती देताना ‘आपण सध्या एका वेगळ्या परिस्थितीत काम करत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक ही बहुधा जगातील एकमेव केंद्रीय बँक असेल जिथे कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी स्पेशल क्वॉरंटाईन फॅसिलिटी सेटअप तयार केला आहे. महत्त्वपूर्ण कामात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून हे केले गेले’ असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

आर्थिक सुधारणांना सुरुवात होताच रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आरबीआयतर्फे घेण्यात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये काहीही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्केच ठेवण्यात आला आहे. कोरोनामुळे आपल्यावर आर्थिक संकट ओढावले आहे पण गेल्या तिमाहीपेक्षा यावेळी परिस्थिती सुधारली आहे असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेपो रेट कमी केला जाऊ शकतो असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी बांधला होता पण शक्तिकांत दास यांनी रेपो रेट स्थिर ठेवला आहे. कोरोनाची लस आल्यावर आपली आर्थिक स्थिती बदलू शकते असं देखील शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!